बच्चनसाहेब बऱ्याच दिवसांपासून म्हणत होते "कभी तो पधारो म्हारे गुजरात मां" म्हणून विचार केला ह्यावेळी गुजरातलाच जावं. गुजरातमध्ये चंपानेर (आम्ही चंपानेर म्हणतो तिकडची माणसे चापानेर म्हणतात)नामक एक शहर आहे. तेथील काही मशिदी व पावागढ ही प्रसिद्ध ठिकाणं.
सुमारे २ महिने पहिलेपासून आरक्षण केल्यामुळे जागेचा काही प्रश्न नव्हता. आमचा प्रवास सुरु झाला तो रविवारी मध्यरात्री १२.४० च्या डेहराडून एक्सप्रेसने. आमचा ६ जणांचा ग्रुप होता. आम्ही सगळे आधी बोरिवलीस्टेशन वर भेटलो. मी, अजय, वीणा, श्रेया , प्राजक्ता आणि अमित. सगळ्यांची तोंडओळख झाली. चांगली मैत्री व्हायला ती सुद्धा पुरेशी होती कारण पुढचा पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच काढायचा होता.
झालं तर मग सुमारे साडेबाराच्या सुमारास गाडीत बसून मस्त झोप काढून सकाळी ८ वाजता चंपानेर स्टेशनवर उतरलो. चंपानेर हे स्टेशन निर्जन लोकवस्तीतील रेल्वे स्टेशन. मोजून १० माणसंसुद्धा नसतील स्टेशनवर. वेळ कमी असल्यामुळे उतरल्यावर रिक्षावाल्याची वाट बघेपर्यंत चहा नाश्ता करून घेतला तोपर्यंत रिक्षापण आली दोन रिक्षा सांगून पण रिक्षावाल्याने एकच रिक्षा आणली. मग काय ऍडजस्ट करून आम्ही ६ जण एकाच रिक्षेत बसलो आणि मग त्या रिक्षेची बैलगाडी कधी झाली हे कळलं सुद्धा नाही. फक्त गुजरातचे रस्ते चांगले असल्याकारणाने कोणाला त्रास जाणवला नाही.
रिक्षात बसून अजयने गुगल मॅप चालू करून आम्हाला आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून दिली. बरीचशी ठिकाणे आम्ही रिक्षातूनच पहिली. ९.२० च्या सुमारास आम्ही आमच्या पहिल्या ठिकणी पोहोचलो ते म्हणजे "शहर की मस्जिद".
आतमध्ये हवा व उत्तम प्रकाश येण्यासाठी दोन्ही बाजूला दोन झरोके आहेत. मशिदीच्या आतमध्ये एकसारख्या असणाऱ्या खूप साऱ्या कमानी व मध्यभागी उत्तम नक्षीकाम असणारे घुमट आहे.
सुमारे २५ मिनिटांचा वेळ घेऊन आम्ही ९.४५ ला तिथून काढता पाय घेतला व आमचं मुख्य लक्ष्य असणाऱ्या जामा मस्जिदकडे वाटचाल सुरू केली. पाच मिनिटाच्या अंतरावर असलेली ही मस्जिद मुस्लिम स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
सुमारे २ महिने पहिलेपासून आरक्षण केल्यामुळे जागेचा काही प्रश्न नव्हता. आमचा प्रवास सुरु झाला तो रविवारी मध्यरात्री १२.४० च्या डेहराडून एक्सप्रेसने. आमचा ६ जणांचा ग्रुप होता. आम्ही सगळे आधी बोरिवलीस्टेशन वर भेटलो. मी, अजय, वीणा, श्रेया , प्राजक्ता आणि अमित. सगळ्यांची तोंडओळख झाली. चांगली मैत्री व्हायला ती सुद्धा पुरेशी होती कारण पुढचा पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच काढायचा होता.
झालं तर मग सुमारे साडेबाराच्या सुमारास गाडीत बसून मस्त झोप काढून सकाळी ८ वाजता चंपानेर स्टेशनवर उतरलो. चंपानेर हे स्टेशन निर्जन लोकवस्तीतील रेल्वे स्टेशन. मोजून १० माणसंसुद्धा नसतील स्टेशनवर. वेळ कमी असल्यामुळे उतरल्यावर रिक्षावाल्याची वाट बघेपर्यंत चहा नाश्ता करून घेतला तोपर्यंत रिक्षापण आली दोन रिक्षा सांगून पण रिक्षावाल्याने एकच रिक्षा आणली. मग काय ऍडजस्ट करून आम्ही ६ जण एकाच रिक्षेत बसलो आणि मग त्या रिक्षेची बैलगाडी कधी झाली हे कळलं सुद्धा नाही. फक्त गुजरातचे रस्ते चांगले असल्याकारणाने कोणाला त्रास जाणवला नाही.
रिक्षात बसून अजयने गुगल मॅप चालू करून आम्हाला आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून दिली. बरीचशी ठिकाणे आम्ही रिक्षातूनच पहिली. ९.२० च्या सुमारास आम्ही आमच्या पहिल्या ठिकणी पोहोचलो ते म्हणजे "शहर की मस्जिद".
शहर कि मस्जिद (SHEHAR KI MASJID)
वेळेचा अभाव असल्याने आम्ही ह्या मस्जिदमध्ये झटपट एक कटाक्ष टाकला. १५-१६ व्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या मशिदीमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. ह्या मशिदीत प्रवेश करण्यासाठी एकूण पाच प्रवेशद्वार असून उंचच्या उंच मनोऱ्यांमध्ये मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे.सुमारे २५ मिनिटांचा वेळ घेऊन आम्ही ९.४५ ला तिथून काढता पाय घेतला व आमचं मुख्य लक्ष्य असणाऱ्या जामा मस्जिदकडे वाटचाल सुरू केली. पाच मिनिटाच्या अंतरावर असलेली ही मस्जिद मुस्लिम स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
जामा मस्जिद (JAMA MASJID)
जामा मस्जिद हि १५ व्या शतकातली मस्जिद असून 'सुल्तान महमूद बेगदा' यांनी बांधलेल्या सर्वात लक्षणीय स्मारकेंपैकी हे एक आहे. मस्जिदीच्या प्रवेशद्वारातच चहुबाजूने जाळीदार नक्षीकाम असलेले आवार आहे त्यातून डाव्याबाजूस एक प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार हे दोन मिनारच्या मध्यभागी असून ह्याची उंची सुमारे ३० मीटर आहे.
मुख्य प्रवेशद्वार
मशिदीच्या आतमध्ये प्रशस्त वावर असून दोन्ही बाजूला खिडक्या आहेत मशिदीच्या वरील बाजूस उत्तम कलाकुसर असलेले नक्षीकाम असून बाहेरील बाजूस राजस्थानी राजवाड्यासारख्या खिडक्या आहेत.
मशिदीच्या समोरील प्रशस्त वावर
मशिदीवरील नक्षीकाम
राजस्थानातील राजवाड्याप्रमाणे असणाऱ्या खिडक्या
मशिदीच्या बाहेरून उजव्या बाजूस एक विहीर आहे. बारमाही पाणी असणाऱ्या ह्या विहिरीस चारी बाजूस त्रिकोणी आकारात पायऱ्या आहेत.
जामा मस्जिदच्या बाजूला असणारी बारमाही पाण्याची विहीर
भव्यदिव्य असणाऱ्या ह्या मशिदीतील नक्षीकाम बघून केवळ थक्क व्हायला होते. नाही नाही म्हणता ह्या मशिदीत आमचा एक तास गेला. पण तो एक तास तिथे व्यतीत करणं गरजेचं होते कारण अशी वास्तू पुन्हा पुन्हा पहायला मिळत नाही.
१०.४५ ला आम्ही जामा मस्जिद मधून निघून पावागढच्या दिशेने वाटचाल सुरु केली. पावागढला जायला गडाच्या खालून जीप मिळते ती तुम्हाला गडाच्या मध्यावर नेऊन सोडते. तिथून वर जाण्यासाठी रोप वे चा मार्ग आहे. रोपवे ने गडावर जाण्यास ६ मिनिटे लागतात परंतु रोप वे ला रांग किती आहे त्यावर ते अवलंबून आहे. ११.१५ ला नंबर लावून १२.३० ला आमचा नंबर आला. उशीर झाल्यामुळे आम्ही फक्त वरून एक फेरफटका मारून परत खाली आलो आणि परतीच्या दिशेने निघालो.
उडनखटोला
पावागढ वरील मंदिर
एव्हाना एक वाजला होता ३ वाजताची गाडी असल्यामुळे आमच्याकडे २ तासच शिल्लक होते त्यात चाम्पानेर ते बडोदा हा ५७ किमी चा प्रवास. आम्ही पटकन रिक्षेत बसलो आणि बडोदा स्टेशन च्या दिशेने प्रवास चालू केला वाटेत एक हेलिकल विहीर लागली ती बघू कि नको बघू कि नको असा विचार चालू होता पण म्हणलं परत एवढ्या दूर कधी येऊ म्हणून सगळ्या जणांनी उतरायचं ठरवलं आणि २ मिनिटातच विहिरीच दर्शन घेतल आणि परत वाटेल लागलो.
हेलिकल विहीर (HELICAL STEPWELL)
आत्तापर्यंत काही खाल्ले नसल्याने भूक तर प्रचंड लागली होती. म्हणून श्रेयाने आणलेल्या इडल्यांवर सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला. ३ ची गाडी असताना आम्ही बरोबर २.५५ ला बडोदा स्टेशन वर पोचलो. सुदैवाने म्हणावं कि दुर्दैवाने ती गाडी ४५ मिनिटे उशीरा होती. पण त्यामुळे घरी पोचायला खूप उशीर झाला. पण एका दिवसात एव्हडं सगळं पाहायचं म्हणजे ओढाताण होणारच.
मजा आली कि त्रास झाला हे पाहायचं झाल्यास मजाच दिसणार!!! त्यामुळे ह्यासगळ्या गोड आठवणी घेऊन आम्ही दुपारी ४ ची ट्रेन पकडून घरच्या प्रवासाला सुरुवात केली व रात्री सुमारे १२ च्या सुमारास घर गाठलं.
Back to home...
टीप : - चंपानेर पूर्ण पाहायचं झाल्यास एक दिवस अगोदर जायला हवं. चांपानेर हे छोटंसं रेल्वे स्टेशन असून इथे प्रत्येक ट्रेन थांबत नाही जवळच स्टेशन वडोदरा आहे. वडोदरापासून चंपानेर ५७ किमी असून चंपानेरला जाण्यास बस मिळते. पावागढ ला सकाळी गेल्यास बाकी सगळी ठिकाणे वेळेत पाहू शकतो.
एकदा गर्दीची वेळ चालू झाली कि रोप वे च्या रांगेतच वेळ वाया जातो. पुरेशी माहिती नसल्यामुळे सात कमान सारखी वास्तू आमच्या नजरेतून सुटली. सातकमान पाहायचे झाल्यास पावागढ पर्यंत जायची गरज नाही ते वाटेतच लागते.
काही राहिलेल्या वास्तूंना भेट देण्यासाठी पुन्हा एकदा नक्की चंपानेरला नक्की भेट देऊ.
तोपर्यंत गुड बाय ....
GOOGLE MAP LOCATION
शहर कि मस्जिद
जामा मस्जिद