Monday, 1 January 2018

ऐतिहासिक विहिरींची एक सफर (HISTORICAL STEP WELL)

        रविवारचा  दिवस, संध्याकाळचे काही "Family function" मग अशा परिस्थितीत अर्ध्या दिवसात काय करता येईल असा विचार मनात असतानाच माझ्या मित्राचा फोन आला कि बदलापूर जवळ एक पांडवकालीन विहीर आहे ती पाहायला जाऊ. ठरलं तर मग रविवारी सकाळी आम्ही सकाळी सुमारे ७.३०च्या सुमारास निघालो. बदलापूर शहरापासून ५ किमी अंतरावर  देवळोली  गावात असलेली हि विहीर शिवकालीन कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. ह्याविहिरीला बाराही महिने पाणी असतं ह्या विहिरींची रचना हि शिवलिंगाप्रमाणे आहे. ह्या विहिरीत उतरायला १२ ते १५ पायऱ्या आहेत. अर्ध्या पायऱ्या उतरल्यावर दोन्ही बाजूला दिवे लावण्यास कोनाडे आहेत. विहिरीच्या मुखद्वारावर गणपती आणि इतर देवांच्या मूर्ती आहेत. गावकऱ्यांच्या माहिती प्रमाणे शिवाजी महाराज ह्यवाटेने जाताना येथे घोडे बदलायचे.

 शिवलिंग आकाराची विहीर 

विहिरीचे प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावरील शिल्प

                            
             Google  Location
          नंतर मग आला डिसेंबर महिन्यातला LONG WEEKEND. मनात काहीच योजना नव्हती. खरंतर जायच होतं रोह्याला पण गेलो पुण्याला.  दुसरा दिवस रविवारचा होता कुठे जावं हे पुण्याला जाईपर्यंत ठरलं नव्हतं. साताऱ्याची बारामोटेची विहीर ऐकून होतो म्हंटल तिथेच जावं. पुण्याहुन सकाळी ८.३० च्या सुमारास निघालो ट्राफिक प्रचंड असल्यामुळे साताराला पोचायला ३ तास लागले. पुणे सातारा वाटेवर नागेवाडी नावाचं एक गाव लागत तिथून ४ किलोमीटर आत गेल्यावर लिंब गावात प्रवेश होतो. सुमारे ३०० वर्ष जुनी असलेली हि "बारामोटेची विहीर (BARAMOTECHI VIHIR)" ह्याच लिंब गावात आहे.

                           
 Google  Location  

        ह्या विहिरीचे बांधकाम शके १६४१-४६ या कालावधीत श्रीमंत श्री विरुभाई भोसले यांनी केले विहिरीचा आकार अष्टकोनी व  शिवलिंगाकृती असून खोली ११० फुट व व्यास ५० फुट आहे.विहीरीत महाल आहे.
महालात चित्रे कोरली आहेत. तसेच वाघ, सिंहाची शिल्पे बनवलेली आहेत.विहरीत प्रशस्त असा जिना चोरवाटा आहेत. ह्या महालावर सिहासन व दर्बारीची जागा आहे.विहिरीत १५ मोटा असून इथे एका वेळी १२ मोटा चालत असतात.सातारचे राजे श्रीमंत प्रतापसिह महाराज यांची विहिरीच्या महालात खलबते चालत.

बारा मोटेची विहीर 
 विहिरीतील खांबांवर असलेल्या सुबक कलाकृती 

 प्रवेशद्वारावरील शिल्प 

 विहिरींमधील शिल्प 
         बारामोटेच्या विहिरीवर सुमारे एक तास घालवून आता स्वारी साताऱ्याच्या दिशेने वळवली . बसची वाट बघून बस तर काही मिळाली नाही पण एका दुचाकीस्वाराने सातारा बस स्टॅन्डपर्यंत सोडलं . आता खरा प्रश्न पुढे होता कि जायचं कुठे ?? समोर सज्जनगडची बस उभी होती पण घड्याळात पाहिल्यावर कळलं  कि आधीच २ वाजले आहेत म्हणून मग तिकडे जाण्याचा बेत रद्द केला व कराडला जायचा निर्णय घेतला कराडला "नकट्या रावळाची" विहीर आहे हे ऐकून होतो मग म्हटलं आता तिकडेच जावं . कराड हे साताऱ्यापासून ४६ किमी अंतरावर आहे . २ वाजता पकडलेली बस ३.१५ च्या सुमारास कराड ला पोहोचली . थोडस जेवुन आपला मुक्काम विहिरीच्या दिशेने वळवला. 
            कराड शहरात असलेली विहीर हि तिथल्या किती जणांना माहित आहे कुणास ठाऊक?? कारण मी बस मध्ये असताना २-३ जणांना  विचारलं तुम्हाला माहिती आहे का हि विहीर?? तर ते नाही म्हणाले!!!  एकाने तर मी इतक्या लांबून विहीर पाहायला आलो म्हणून मलाच वेड्यात काढलं.
 नकट्या रावळ्याची विहीर
           खरं पाहिलं तर कराडला ऐतिहासिक वारसा आहे. इथल्याच पंतांच्या कोटात शिवकालीन भुईकोट किल्ला असून, त्याचाच एक भाग म्हणजे येथील 'नकट्या रावळ्या'' (NAKTYA RAWLYACHI VIHIR) ची विहीर !
           कराड शहराच्या वायव्येस कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो तिथेच यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.  ह्याच प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे.आहे. तेथे असणाऱ्या पायविहिरीला स्थानिक नागरिक "नकट्या रावळ्याची" विहीर म्हणून ओळखतात. दगड आणि पांढऱ्या मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ' नकट्या रावळाची ' ही विहीर सुमारे 41.5 मीटर लांब असून, त्यात 30.5 मीटर लांबीचा सोपानमार्ग व खाली ११ बाय ११ मीटर चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी ९९ पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे .प्रत्येक 20 पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी (सोपान) आहे. पायऱ्या संपतात त्या ठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत.12 व्या शतकात 'शिलाहार' राजवटीत नकट्या रावळ्याच्या ही ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती.
          ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे सांगण्यात येते.
विहिरीच्या आतील बाजूने टिपलेले छायाचित्र
      
Google  Location
       सध्या पुरातत्व खात्याच्या अख्यारीत असूनसुद्धा ह्या विहिरींची दुरावस्था दिसून येते. फक्त पाणी जरी स्वच्छ केलं तरी ह्या विहिरीला नवसंजीवनी प्राप्त होईल. खरतर इतकी भव्य असलेली विहीर हि सुट्टीच्या दिवशी रिकामी पहिली आणि मनात थोडंसं दुःख वाटलं पण शांततेचा आनंद मिळाल्याचं समाधान हि लाभलं. कोणी नसल्यामुळे फोटो काढण्यास हि काही अडथळा नव्हता खूप सारे फोटो काढले आणि कराड वरून परत पुण्याच्या वाटेला लागलो. 
          ऐतिहासिक वास्तूंची कोणाला आवड असेल तर मुद्दाम वेळात वेळ काढून नकट्या रावळ्याच्या विहिरीला नक्की भेट द्या.

 
भव्य वास्तूचा अप्रतिम नमुना


4 comments:

  1. We were not aware of these historic wells, here in Maharashtra! Great hands on information. A map would have definitely been more useful.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes Madam,
      As per your suggestion blog update with location details.
      thanks for your valuable reply.
      and always welcome your suggestions.

      Delete
  2. या खूपच सुंदर विहिरी आहेत. मी देखील पुण्यालगतच्या विहिरीबाबत पाहणी करतोय. एक पांडवकालीन विहिर म्हटतात. त्याची बांधणी वरील पहिल्या विहिरीसारखी आहे. बारामोटेची विहिरीला पण भेट दयायची आहे. वरील माहिती उपयुक्त आहे. पण या विहिर चांगल्या स्थितीत आणण्यासाठी काही तरी आपणच प्रयत्न करायला हवेत. तरच ते जतन होतील. अनमोल असा हा ठेवा आहे. कारण आता अशा विहिर कोणीच बांधणार नाही. जे आहे ते जतन करणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  3. नमस्कार ! मी विनायक गरुड, कराड. आपला ब्लॉग अत्यंत आवडला. कऱ्हाडला आम्ही सरस्वती उत्सवाच्या निमित्त एक भारतशास्त्रीय कऱ्हाड नावाने प्रदर्शन व व्याखान ठेवले आहे. यामध्ये कऱ्हाडच्या ऐतिहासिक गोष्टींवर काही माहिती प्रदर्शित करीत आहोत. नकट्या रावळ्याची विहीर संदर्भात आपल्याशी चर्चा करणे आवश्यक वाटते. आपण आपला संपर्क क्रमांक दिल्यास बोलता येईल. माझा नंबर- ९४२०४९३५०६

    ReplyDelete