एक रविवारच्या आरामानंतर पुन्हा आपल्या सफरीला सुरुवात झाली. उन्हामुळे जवळपास दुर्गभ्रमंतीला अल्पविराम मिळाला आहे म्हणून आता जवळपासच्या काही ठिकाणांना भेट देण्याची ही वेळ आहे असं म्हणून ह्यावेळी नायगाव जवळील पाणजू बेटाला भेट द्यायचं ठरवलं. पणजू बेटांचे वैशिष्ट्य म्हणजे वसई नायगाव जवळच असणारं हे बेट पण आजही रस्त्याच्या सुखसोयीपासून वंचित असणारे हे बेट. आजही पाणजू गावात जायचं झाल्यास बोटीचा वापर करावा लागतो.
रविवारी सकाळी लवकर निघून कोपर वरून सकाळी साडेपाच वाजताची बोईसर ट्रेन पकडून आधी वसई गाठलं. वसईला पोहचेपर्यंत सकाळी साडेसहा वाजले. वसई स्टेशनवरूनच सकाळचा सूर्योदय टिपला. तिथून नायगवसाठीची लोकल पकडून नायगावला पोहोचलो.
नायगाव स्टेशनच्या बाहेर अप्रतिम असं साईबाबांचे देऊळ आहे ती मूर्ती पाहूनच मनात भरते. त्याचे दर्शन घेतले व बाकी मित्रांची वाट बघत बसलो. बाजूलाच एक मावशी नाश्ता विकत होत्या त्यांच्याकडे नाश्ता करू म्हंटलं. म्हणून शिरा घेतला व त्यांना पाणजू गावाबद्दल विचारण्यास सुरुवात केली त्यांनी मला जवळपास सगळी माहिती सांगितली. एव्हाना माझे मित्र आले मग आम्ही बोटीपर्यंतचा प्रवास पायीच करण्याचा निर्णय घेतला. पंधरा मिनिटांतच आम्ही बोटीपाशी पोचलो.
नायगाव स्टेशन पासून १०-१५ मिनिट चालत गेल्यावर पाणजू बेटावर जायला बोट मिळते. दर अर्ध्या तासाने बेटावर जायला बोट असते. तसं ८ च्या सुमारास आम्ही बोटीत प्रवेश केला पाणजू बेट समोरच दिसत असल्याने आम्ही बोटीने पाच मिनिटातच पाणजू बेटावर पोचलो
रविवारी सकाळी लवकर निघून कोपर वरून सकाळी साडेपाच वाजताची बोईसर ट्रेन पकडून आधी वसई गाठलं. वसईला पोहचेपर्यंत सकाळी साडेसहा वाजले. वसई स्टेशनवरूनच सकाळचा सूर्योदय टिपला. तिथून नायगवसाठीची लोकल पकडून नायगावला पोहोचलो.
वसई स्टेशन सूर्योदय
साईमंदिर
पाणजू बेट
पाणजू बेटाच्या प्रवेशद्वारातच त्या बेटावरील स्वातंत्र्यसेनांनीच्या नावाचे स्मृतीचिन्ह लावण्यात आले आहे. तिथूनच गावची सुरुवात होती गावात आजही जुन्या काळापासून चालत आलेली घरं आहेत. ह्या गावात पोहोचण्यासाठी पूल नसल्याकारणाने आजही ह्या गावात एकही गाडी नाहीये पण त्याचमुळे की काय आज हे गाव प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करून आहे.
हुतात्मा स्मारक
गावात बऱ्याच जणांनी आता नवीन घरे बांधली आहेत त्यातले एक घर आम्ही पाहिलं त्या घरात समोरच्या खोलीतच प्राण्यांची लक्षवेधक चित्र काढलेली होती. आम्ही ती बाहेरूनच बघत होतो नंतर त्या घरातल्या मावशींनी आम्हाला आत बोलावलं तेव्हा आम्हाला कळलं की त्या घरातल्या लहान मुलाच्या हट्टापायी त्यांनी ती चित्रे काढली होती.
घरातील अंतर्गत सजावट
हे झालं मोठं घर पण गावातील छोटी छोटी घरं देखील त्यांचा डौल सांभाळून आहेत. काही घरे जुनी असली तरी त्यांना व्यवस्थित रंगरंगोटी करून त्यांना अजून आकर्षक बनवलं आहे. तेच जुन्या घराचे दरवाजे त्याच जुन्या भिंती छोटेसे का ना होईना पण घराला असलेलं अंगण हे विशेष लक्ष वेधून घेतात. गावात एक एकविरा मातेचे देऊळ दिसले आधी आम्हाला वाटले ते गावचे देऊळ आहे नंतर कळलं ते एका गावकर्यांचं आहे.
एकविरा मातेचे देऊळ
गावातील काही घरे
कोळी बांधवांचा वारसा
त्यांनाच आम्ही गावातली काही ठिकाणे विचारून घेतली आणि पुढे निघालो वाटेतच गावकऱ्यांच्या अंगणातल्या बागेचे बरेच फोटो काढले. ह्या गावातील लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावातील लोक कोणावरही अवलंबून नाही म्हणून प्रत्येकाच्या दारात स्वतःचे अंगण स्वतःची बाग. बागेत वेगवेगळ्या प्रकारची फुले रोजच्या वापरात येणाऱ्या मुबलक भाज्या ह्या सर्वांनी त्यांचे अंगण भरलेले होते.
झेंडू
भेंडी
घोसाळी
शेवग्याची फुले
अंगणातले केळीचे घड
कोंबडा
सुरवंट आणि फुलपाखरू
नवरात्र असल्याने गावात देवीची प्रतिष्ठापना झाली होती त्याचे दर्शन घेतले आणि विसाव्यासाठी म्हणून दहा मिनिटे तिथेच बसलो. तेवढ्यात तिकडून आम्हाला गावात सोडलेल्या बोटीचा चालक घरच्या दिशेने चालला होता त्यांचे नाव दिलीप भोईर. आम्हाला बघून तो पण क्षणभर थांबला आणि आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला विचारलं कसं वाटलं आमचं गाव??? आम्ही बोललो मस्तच.
गावातील देवीची प्रतिष्ठापना
त्यावर त्यांनी गावची सगळी माहिती सांगितली जिथे बसलेलो तिथेच गावचे ग्रामदैवत हनुमानाचे अप्रतिम मंदिर होते ते त्यांनी दाखवले हनुमान जयंतीला तिथे मोठा कार्यक्रम असतो. त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढचा प्रवास आम्ही दिलीप दादांसोबतच केला ते म्हणाले चला तुम्हाला गावातले तलाव दाखवतो
गावातील हनुमान मंदिर
. त्यांच्या घराजवळच असणारा हा गोड्या पाण्याचा तलाव त्यात मासे सोडून नंतर मोठे झाल्यावर विकायचा हा ह्यांचा खरा व्यवसाय. पुढे त्यांच्या घराजवळ आम्ही विसावा घेण्यास थांबलो तेव्हा त्यांनी आम्हाला गावची सगळी माहिती देण्यास सुरुवात गेली गावात सुमारे १२० वर्ष जुनी शाळा आहे.
गावातील गोड्या पाण्याचा तलाव
१८९८ सालची शाळा
१८९८ सालची शाळा
मागच्या बाजूस मिठागरे आहे. पुढे इंग्रजांच्या काळातील रेल्वेचा जुना पूल आहे. ही सगळी माहिती देत असताना त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला वेळ आहे का?? असेल तर मी तुम्हाला मिठागरे दाखवायला येतो. आम्ही म्हणालो चला!!! म्हणून दिलीप दादा जसे होते त्याच स्थितीत आमच्या सोबत निघाले मी म्हंटल दादा चप्पल नाही का घालत तर त्यावर ते म्हणाले मला सवय आहे पण पूर्ण काट्यातला असलेला हा प्रवास त्यांनी आमच्यासाठी अनवाणी पायांनी केला.
मिठागरे
मिठागरापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी आम्हाला मिठाची पूर्ण प्रक्रिया सांगितलं त्यातून येणारे उत्पन्न ह्यावर त्यांनी माहिती दिली आता रेल्वेचा नवीन पूल समोरच दिसत होता तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं आधी इथे सुरुवातीला मातीचा पूल होता नंतर रेल्वेसाठी लोखंडी पूल झाला आजमितीस तो तिथे अस्तित्वात आहे. तुम्ही बघणार का??? आम्ही बोललो हो पण खरं सांगायचं तर पुढचा रस्ता बाभळीच्या झुडपांनी भरलेला होता. मला आमची काही काळजी वाटत नव्हती पण मला त्यांच्यावर दया येत होती दिलीपदादा बिचारे आमच्यासाठी उघड्या अंगावर झुडपं बाजूला करून आमच्यासाठी वाट काढून चालत होते त्यात अनवाणी पाय. शेवटी आम्हाला त्यांनी वाटेत लागलेला सुरुवातीला मातीतला पूल दाखवला आणि खाडीपर्यंत घेऊन गेले
वसईची खाडी त्यावरील पूल
पुढे रेल्वेचा जुना पूल नजरेस पडला. त्यावर ते म्हणाले चला तिकडे जाऊ आमच्यासाठी तो दिवस म्हणजे सोन्याहुन पिवळा होता त्यांच्याबरोबर आम्ही जुन्या पुलावर गेलो बाजूलाच असणाऱ्या नवीन पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू होती. त्याचे काही फोटो काढून आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.
इंग्रजांच्या काळातील जुना रेल्वे पूल
तेव्हा वाटेत दोन रस्ते लागले तेव्हा स्वतः दिलीपदादांनी आम्हाला विचारलं घराकडे जायचं की खाऱ्या पाण्याच्या तलावाकडे जायचं त्यावर आम्ही बोललो तलावाकडे. मग ते आम्हाला खाऱ्या पाण्याच्या तलावाकडे घेऊन गेले वाटेत गावातलं मैदान दाखवलं. तिथून पुढे गावातील जुने ग्राम दैवत म्हणजे ब्राह्मणदेवाचे देऊळ लागले तिथले दर्शन घेऊन आम्ही दादांच्या घरी गेलो
खाऱ्या पाण्याचा तलाव
गावातील मैदान
ते पाहून आम्ही जेवायला म्हणून दिलीपदादांच्या घरासमोर गेलो. स्वतःचा वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला त्यांचं गाव दाखवलं म्हणून आम्ही त्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून द्यायचं ठरवलं त्यावर त्यांनी नम्रपणे म्हंटलं आमच्या गावाची चार ठिकाणी माहिती होईल ह्यातच मला आनंद आहे. मला पैसे वगैरे काही नको.मित्रांनो ही माणुसकी फक्त गावाकडेच मिळू शकते एका ब्लॉगमध्ये आम्ही वाचलं होतं की पाणजू गावातील लोक अतिथींच स्वागत करत नाही पण त्या गावकऱ्यांनी आमचं केलेलं आदरातिथ्य पाहून आम्हीच थक्क होतो म्हणून आम्ही दिलीप दादांची छोटीशी मुलाखत घेतली
दादांची मुलाखत नक्की ऐका
त्यांची यशोगाथा ऐकून माझ्या डोळ्यातून खरंच पाणी आलं. अश्रूंनी भिजलेले डोळे घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला एव्हाना दुपार झाली असल्याने गावातली मुलं तलावावर पोहायला आली होती त्यांची मजा कॅमेरात कैद करून पुन्हा बोटीच्या ठिकाणी गेलो तिथून बोट करून पुन्हा नायगाव स्टेशन गाठलं आणि साडेपाचच्या सुमारास पुन्हा थेट घरात प्रवेश केला
परतीचा प्रवास