महाराष्ट्रातील माझं सर्वात आवडतं शहर कोणतं असेल तर ते म्हणजे "औरंगाबाद". किल्ले, लेण्या आणि मंदिर ह्याचा त्रिवेणी संगम असणारं एकमेव शहर म्हणजे "औरंगाबाद". माझ्या वहिनी सागरिका वहिनी त्यांचं माहेर औरंगाबाद. एक दिवस त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांच्याकडून माहिती मिळाली की औरंगाबादला "CITY OF GATES" म्हणतात. पुरेशी माहिती त्यांच्याकडून घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी ट्रेनचं बुकिंग केलं.
औरंगजेबाने जेव्हा औरंगाबाद ही आपली राजधानी म्हणून निवडली तेव्हा शहर सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्याने शहरामध्ये सर्वप्रथम ठिकाणी दरवाजे बांधण्यास सुरवात केली. परकीयांनी कितीही हल्ले केले तरी त्यापासून शहराला काही धोका पोहचू नये हा त्यामागचा हेतू. औरंगजेबने त्यावेळी असे ५२ दरवाजे बांधले आजमितीस त्यातील काहीच दरवाजे सुस्थितीत आहेत.
मी अजय आणि प्राजक्ता आमचा प्रवास औरंगाबादच्या दिशेने सुरु झाला तो म्हणजे शनिवारी रात्री देवगिरी एक्सप्रेसने. पहाटे ४ वाजता आम्ही औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर उतरलो. सकाळी फ्रेश होऊन सुमारे साडेपाचच्या सुमारास चालायला सुरुवात केली. घरून निघतानाच जायची ठिकाणं Map वर मार्क केली होती त्यामुळे जाताना आम्ही जरी ३ जण असलो तरी आमचा चौथा मित्र होता तो म्हणजे GOOGLE MAP.
त्या दिवसात आम्ही सुमारे १५ दरवाजे पाहणार होतो. त्यांचे फोटो व माहिती खालीलप्रमाणे.
१) बारापुल्ला गेट
बारापुल्ला गेट मधून बाहेर पडताना लागणाऱ्या पुलाला पाणी येण्या जाण्यासाठी १२ कमानी होत्या म्हणून ह्या दरवाज्याचे नाव बारापुल्ला गेट.
२) मेहमूद दरवाजा
३) भडकल दरवाजा
भडकल दरवाजा हा विजयाचे प्रतीक म्हणून बांधलेला दरवाजा म्हणून ओळखला जातो. भडकल दरवाजा हा शहरातील सर्वात पहिला व दख्खन मधील सगळ्यात मोठा दरवाजा होय. हा दरवाजा त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे.
४) छोटी भडकल दरवाजा
भडकल दरवाजासमोरील असलेली एक कमान भडकल दरवाज्यापेक्षा काही अंशी छोटी असल्याने ह्याला छोटी भडकल म्हणून ओळखले जाते.
५) मकाई गेट
मक्केच्या दिशेने जाणाऱ्या ह्या दरवाज्याला मकाई दरवाजा म्हणून ओळखले जाते
६)नौबत दरवाजा
७)काला दरवाजा
काला दरवाजा हा त्याच्या भक्कम बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. ह्या दरवाजाच्या बांधकामासाठी सगळ्यात जास्त काळ्या दगडाचा वापर करण्यात आला असल्याने ह्यास "काला दरवाजा" म्हणून ओळखले जाते. काला दरवाज्याची भिंत हि सर्वात मोठी आहे एका दरवाज्यावरून दुसऱ्या दरवाज्यावर जाण्यासाठी ह्या भिंतीचा वापर केला जायचा.
८) रंगीन दरवाजा
रंगीन दरवाजासमोर आधी रंगीबेरंगी प्रकाशात नृत्याविष्कार सादर होत म्हणून ह्यास रंगीन दरवाजा ह्या नावाने संबोधले जाते.
९) दिल्ली गेट
दिल्ली दरवाजा हा दिल्ली शहराकडे तोंड करून उभा असल्याने ह्यास दिल्ली दरवाजा म्हणून ओळखले जाते. दिल्ली दरवाजा हा त्याच्या भक्कमपणाची निशाणी आहे ह्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. दरवाज्यावर आजही टोकेरी खिळे आहेत त्यामुळे ह्यास हत्तीसुद्धा धडक देऊ शकत नाही.
१०) नूर गेट
औरंगाबादच्या भरवस्तीत असणारा हा एक जुना दरवाजा. इतका उत्कृष्ट असणारा हा दरवाजा पण आज ह्या ठिकाणी प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य उभे ठाकले आहे
११) रोशन गेट
शहाजहानची बहीण रोशनाराच्या नावाने हा दरवाजा ओळखला जातो. पूर्वेला सूर्योदयाच्या दिशेने असणारा हा दरवाजा सकाळच्या सूर्यप्रकाशाने रोशन होणारा हा दरवाजा म्हणून हा रोशन दरवाजा.
१२)कट कट गेट
पूर्वीच्या काळी सकाळ संध्याकाळ दरवाजे चालू बंद केले जायचे त्यावेळी ह्या दरवाज्यातून कट कट असा आवाज यायचा म्हणून हा कटकट दरवाजा.
१३) खास गेट
आत्ताच्या काळी हा दरवाजा पूर्णपणे पाडण्यात आला आहे.
१४) जफर गेट
जफर दरवाज्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी आजही हा दरवाजा सुस्थितीत आहे. आज ह्या जागेवर आठवडी बाजार भरला जातो
१५) पैठण गेट
पैठण शहराच्या दिशेने जाणाऱ्या ह्या दरवाजास पैठण दरवाजा म्हणून ओळखले जाते हा दरवाजा शहरातील सगळ्यात छोटा दरवाजा आहे.
ठरल्याप्रमाणे इथे आमचा दरवाज्यांचा प्रवास संपला होता एव्हाना सकाळी साडेपाचच्या सुमारास सूरु केलेली चाल बरोबर १२ वाजता संपली. एव्हाना १७ किमी चालणं झालं होतं. वेळ असल्याने आम्ही वेरूळच्या लेणीला भेट द्यायचं ठरवलं म्हणून बस डेपो पर्यंत रिक्षा करून वेरूळच्या दिशेने जाणारी बस पकडली. वेरूळची गर्दी पाहून आधी जेवण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच तिथे १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरची पाटी वाचली म्हणून आधी देवळात जाऊन दर्शन घेतलं मग वेरूळच्या लेणीत प्रवेश केला.
गर्दी असल्याने हवा तसा आनंद घेऊ शकलो नाही म्हणून थोडेफार फोटो घेऊन चारच्या सुमारास परतीच्या प्रवासाला लागलो.
आमचे स्नेही रावकाका औरंगाबाद शहरात असल्याने संध्याकाळी त्यांच्याकडे येतो असा त्यांना शब्द दिल्याने संध्याकाळी त्यांच्याकडे भेट देण्यास गेलो. रात्रीच्या जेवणाचा आस्वाद त्यांच्याकडेच घेतला. दिवसभराच्या उन्हात फिरल्यानंतर मिळालेलं केळीच्या पानावरचं जेवण म्हणजे अमृततुल्यच होतं.
Finally THANK YOU SAGARIKA VAHINI🙏🙏🙏.

रात्रीचे भोजन
परतीची गाडी साडेनऊची असल्याने आम्ही साडेआठच्या सुमारास त्यांचा निरोप घेऊन थेट स्टेशन गाठलं. कधी एकदा ट्रेन पकडून झोपतो असं झालेलं. बरोबर साडेनऊची ट्रेन पकडून सकाळी साडेचार वाजता घरी पोचलो.
एक दिवसात अचानक ठरलेला हा औरंगाबाद दौरा सदैव स्मरणात राहील आणि ह्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे सागरिका वहिनींना.Finally THANK YOU SAGARIKA VAHINI🙏🙏🙏.