गेले काही रविवार ट्रेक केले मध्येच कासच्या पठाराला भेट दिली पाऊस कमी होत होता त्यामुळे जवळपास ट्रेक ना विश्रांती देण्याची हीच वेळ होती. पण तेवढ्यात फेसबुकवर लक्ष गेले आणि तेव्हा लक्षात आलं माझे स्नेही श्री गिरीश कुलकर्णी ह्यांनी ह्याच गुरुवारी सिंहगड ११११ वेळा सर केला त्यामुळे मनात विचार आला ह्या रविवारी आपण त्यांच्यासोबत सिंहगडला भेट द्यायला जाऊ.
ठरलं तर मग दरवेळी प्रमाणे शनिवारी कन्याकुमारी एक्सप्रेस पकडून पुणे गाठलं आणि रात्री वस्तीला त्यांच्याच घरी थांबलो कारण सकाळी साडेतीन वाजता उठून सिंहगडचा प्रवास सुरु करायचा होता. ठरल्याप्रमाणे सकाळी साडेतीन वाजता उठून ४ च्या सुमारास घरातून बाहेर पडून सिंहगडचा प्रवास सुरु केला सुमारे ५ वाजता पायथ्याशी पोहोचून चढाईला सुरुवात केली. पहाटे अंधार असल्याने फोटो काही काढता आले नाही पण आजच्या खास दिवशी वरती एक लाईट दिसला नंतर विचारल्यावर लक्षात आलं की पुणे दरवाज्यात नवीन दरवाजा बसविण्यात आला आहे त्याचं आज म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर उदघाटन होतं. त्यामुळे कुठे पोहोचायचं आहे ते आधीच लक्षात आलं होतं.
बरं सिंहगडाच्या वाटेवर काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या त्या म्हणजे पुणेकारांची सिंहगड विषयीची आत्मियता. सिंहगड हा पोरांपासून थोरांपर्यंत सगळे आवडीने चढायला येतात म्हणजे आमच्या सोबतच असलेला एक मुलगा त्याचं वय जवळपास १० वर्ष असेल आणि दुसरं विरुद्ध उदाहरण म्हणजे वाटेत एक काका भेटले. माझ्यासोबत असलेल्या सरांनी मला सांगितलं हे बघ, ह्यांच वय पंच्याहत्तर वर्ष. तर ते काका म्हणाले ते जुनं झालं ओ आता "सत्त्याहत्तर". हे पाहून मी खरंच थक्क झालो आणि आता तुम्हालाही कळलं असेल की मी सत्त्याहत्तर वर्ष्याच्या व्यक्तीस आजोबा न म्हणता काका का म्हणालो ते. कारण जी व्यक्ती वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी सिंहगड चढू शकते ती व्यक्ती माझ्यासाठी तर चिरतरुणच आहे.
ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे सहसा लोक म्हणतात की मुंबई रात्रीसुद्धा झोपत नाही पण तिकडे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की "अहो मुंबई सोडा पुणे पण रात्री झोपत नाही" कारण आम्ही जेव्हा ५ वाजता चढायला सुरुवात केली तेव्हा काही जण सिंहगड उतरत होती तेव्हा तर मी विचारच करत बसलो की हे सगळे वरती रहायलाच जातात का??? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आम्ही पुणे दरवाज्यापाशी पोहोचलो लखलखत्या प्रकाशात झळाळणाऱ्या पुणे दरवाज्याचा योगायोगाने का ना होईना पण मी साक्षीदार झालो. नुकतंच उजाडल्याने दरवाज्यापाशी गर्दी झालेली म्हणून आधी बाहेरच्या बाजूने सिंहगड न्याहाळला मग पुणे दरवाज्यातून आतील बाजूस प्रवेश करून चहूबाजूने फेरफटका मारला ढगाळ वातावरण असल्याने मोजकेच फोटो काढता आले तरी सकाळचे किमान दोन तास सिंहगडावर व्यतीत करून पुन्हा परतीच्या वाटेने निघालो. साडेआठची बस पकडून पुन्हा गिरीष सरांच्या घरी पोहोचलो.

सिंहगडावरील काही फोटो पुढीलप्रमाणे :-
वन मन आर्मी : गिरीष कुलकर्णी सर
सिंहगडावरील सूर्योदय