मागच्या ट्रेकची नशा उतरते ना उतरते तोच येणाऱ्या रविवारच्या ट्रेक चे वेध लागतात. त्यामुळे बुधवार गुरुवार आला की आमची शोध मोहीम सुरू होते. अट फक्त एकच ट्रेक करायचे तर आडवाटेचे. कारण मुख्य ध्येय असतं ते म्हणजे जायचं कुठे?? तर निसर्गाच्या सानिध्यात आणि शांततेच्या शोधात. ह्यावेळी असंच काही शोधत असताना एक किल्ला दिसला तो म्हणजे "किल्ले गुमतारा".
मी नेहमीप्रमाणे गाईड बरोबर चालायला सुरुवात केली त्याला सगळी माहिती विचारली. नाव काय? काय करतो? घरी कोण असतं? उपजीविकेचे साधन काय?? गप्पा मारत मारत आम्ही ती पाऊलवाट तुडवत होतो. बाहेरून ह्या गडाकडे पाहूनच कळलं होतं की घनदाट जंगलातलाच हा प्रवास आहे. आणि तसंच त्याचा प्रत्यय सुरुवातीला आला. सुरवातीला घनदाट असणारी नागमोडी वळणाची वाट आम्हाला एका तासात गडाच्या जवळपास मध्यावर घेऊन गेली.
वाटेत अमोल ने आम्हाला दाखवलेल्या गोष्टी थक्क करण्यासारख्या होत्या. सुरुवातीला त्याने एक गोगलगाय हातावर घेतली. त्याच्या एकंदरीत आविर्भावाने मला तर असं वाटलं आता भाऊ खातो की काय? पण नाही त्याच्याकडे खरंच भूतदया होती त्याने ती व्यवस्थित एक झाडाच्या पानावर ठेवली.
पुढे जात असताना त्याला एक साप दिसला त्याने पटकन आम्हाला बोलावले आणि तो दाखवला. आम्ही सगळ्यांनी तो शांतपणे पहिला पण मी माझा मित्र अजय ला बोलावलं बघायला. त्याने तो पाहिला पण कदाचित माझ्या हालचालीमुळे त्याने फोटो काढायच्या आतच तो निघून गेला.आजही तो आरोप माझ्यावर आहे. त्याबद्दल अजय SORRY.
त्याच्याशी गप्पा मारत मारत आम्ही त्या बारक्या किल्ल्यापाशी पोहोचलो बारक्या किल्ल्यावर पोहोचल्यावर आम्हाला बालेकिल्यावरचा झेंडा दिसला त्याला विचारलं अजुन किती वेळ लागेल तो बोलला आता पोहोचूतच एव्हाना साडेबारा वाजले होते. बारक्या किल्ल्यावरून उजव्या हाताने आम्ही पुढे निघालो ते चौघे मजा मस्ती करत पुढे चालले होते
तेवढ्या हिरव्यागार परिसरात पण त्यांनी आम्हाला १०० फूट दूर मस्ती करत असणारी खारुताई दाखवली. मी हे सगळं पाहून थक्क होतो. अचानक मिळालेला गाईड पण त्याची बुद्धिमत्ता खरच वाखाणण्याजोगी होती.
पुढे गडाचा सर्वात खडतर टप्पा लागला पण समोरच गडाची तटबंदी दिसायला सुरुवात झाली होती त्यामुळे आता पोहोचलोच ह्या आवेशाने आम्ही त्याच जोशात तो टप्पा पार केला. डाव्याबाजूला गडाचं मुख्यप्रवेशद्वार नजरेस पडलं.
पुन्हा भेटूत....
किल्ले गुमतारा
नावही पहिले कधी ऐकलं नव्हतं पण मग सगळी माहिती काढून जायचं ठरवलं. घरापासून जवळ असल्याकारणाने पुन्हा एकदा Bike नेच जायचं ठरवलं .
रविवारी सकाळी ७ च्या सुमारास घरातून निघालो माझ्या घरापासून गुमतारा किल्ला बरोबर ३५ किमी. गुमतारा किल्ल्याकडे जायला लागणारे गाव म्हणजे "दुगड". दुगड गावात जाण्यासाठी कल्याणहुन भिवंडीमार्गे दुगाड फाट्यावर पोहचायचे आणि डाव्या हाताला आत मध्ये दुगाड गाव लागते. माझ्याकडे BIKE असल्याने मी सकाळी सव्वाआठ च्या सुमारास दुगाडफाट्याला पोहचलो माझ्या मित्रांना यायला वेळ होता मग तिथून च १० किमी पुढे असणाऱ्या वज्रेश्वरी देवीचे दर्शन घ्यायचं ठरवलं आणि निघालो २० मिनिटांत देवळापाशी पोहोचलो दर्शन घेतलं व परत त्याच वेगाने परत गडाच्या पायथ्याशी पोचलो
वज्रेश्वरी मंदिर
आधी नाश्ता केला व पुढे निघालो. गावातल्या कोणाला तरी घ्यावे असा विचार मनात आला म्हणून तिथल्याच एका मुलाला विचारलं येतोस का रस्ता दाखवायला??? त्यावर तो ही थोडा विचार करून येतो म्हणाला पण तो मुलगा मला FRIENDSHIP DAY च्या दिवशी भेटलेला अप्रतिम मित्र. त्याबद्दल सविस्तर बोलुतच. त्याच्या घराजवळ गाडी पार्क केली व ट्रेकला सुरवात केली एव्हाना सव्वादहा वाजले होते. ह्यावेळी आम्ही चार जणच होतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या सोबत Guide म्हणून पण चार जण होते.
गावातून गडावर जाणारी वाट ही वाहणाऱ्या पाण्यातून जाणारी होती. आधी आम्ही पाय न बुडवता जाण्याचा विचार केला पण मग म्हंटलं जाऊदे आता कसला विचार करायचा म्हणून पटापट पाय टाकत चालायला सुरुवात केली.मी नेहमीप्रमाणे गाईड बरोबर चालायला सुरुवात केली त्याला सगळी माहिती विचारली. नाव काय? काय करतो? घरी कोण असतं? उपजीविकेचे साधन काय?? गप्पा मारत मारत आम्ही ती पाऊलवाट तुडवत होतो. बाहेरून ह्या गडाकडे पाहूनच कळलं होतं की घनदाट जंगलातलाच हा प्रवास आहे. आणि तसंच त्याचा प्रत्यय सुरुवातीला आला. सुरवातीला घनदाट असणारी नागमोडी वळणाची वाट आम्हाला एका तासात गडाच्या जवळपास मध्यावर घेऊन गेली.
जंगलवाट
वाटेत बरंच काही कीटक जंगली वृक्ष नजरेस पडले आमच्या सोबत असणारा गाईड त्याचे नाव अमोल कमलाकर सकर. तो खूप लहान होता पण त्याच्यामानाने तो खूप मोठा होता त्याला जंगलातली सगळी माहिती होती तो आम्हाला प्रत्येक झाडाची नाव त्याची माहिती सांगत होता. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येक प्राणी, कीटक त्यांची माहिती आम्हाला त्याने सांगितली त्याच्याशी गप्पा मारताना खूप मजा येत होती
रानहळद
RED MASHROOM
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जंगलात ली काही झाडांची पान त्या मुलांनी चवीने खाल्ली. आणि नंतर आम्हाला त्यांची चव पण सांगितली. मी तर नुसता त्याच्याकडे बघून वेडा झालेलो. त्यांच्या मते गुमतारा किल्ल्याचे २ भाग आहेत एक बारका किल्ला आणि एक मुख्य किल्ला. आम्ही एकदा त्याला विचारलं अजून किती वेळ लागेल तेव्हा तो बोलला अजून बारका किल्ला यायचा आहे. ते ऐकून खरंच खूप मजेशीर वाटत होतं.वाटेत अमोल ने आम्हाला दाखवलेल्या गोष्टी थक्क करण्यासारख्या होत्या. सुरुवातीला त्याने एक गोगलगाय हातावर घेतली. त्याच्या एकंदरीत आविर्भावाने मला तर असं वाटलं आता भाऊ खातो की काय? पण नाही त्याच्याकडे खरंच भूतदया होती त्याने ती व्यवस्थित एक झाडाच्या पानावर ठेवली.
गोगलगाय
नंतर आम्ही चालत चालत पुढे निघालो आम्हा ट्रेकर ना तहान वगैरे लागली तर आम्ही वाटेत लागणाऱ्या "रॉक बिगोनिया" ह्या रोपांची पानं आणि फुलं खातो तर आम्हाला ती वाटेत लागली आणि आम्ही ती खाल्ली आणि तो पुढे असताना त्याला दिली त्याने ती खाल्ली आणि आम्हाला बोलला ह्याला "खडकअंबाडी" म्हणतात. हा शब्द आम्हाला त्याच्याकडूनच समजला.
खडकअंबाडी
SORRY AJAY.....
पुढे एक केळीच झाड लागलं त्याने त्यातून सुद्धा आम्हाला साधारण एक इंचाचीच असतील तेवढी केळी काढून दिली. त्याच्या हातून मिळाल्याने आम्हाला ती सुद्धा गोड लागली. इतकी छोटी केली सुद्धा खाऊ शकतो हे मला तेव्हाच समजलं
एक इंच मोठं केळ
पुढे एक पानावर एक कीटक बसला होता त्याला आम्ही तो दाखवला तर त्याने त्याचं पण नाव सांगितलं पुढचे शब्द त्याच्याच तोंडून. "ह्याला 'पोकळा' बोलतात हा रगत पितो" त्याची सोंड बघून आम्ही हादरलो एक फोटो काढला आणि पूढे निघालो.त्याच्याशी गप्पा मारत मारत आम्ही त्या बारक्या किल्ल्यापाशी पोहोचलो बारक्या किल्ल्यावर पोहोचल्यावर आम्हाला बालेकिल्यावरचा झेंडा दिसला त्याला विचारलं अजुन किती वेळ लागेल तो बोलला आता पोहोचूतच एव्हाना साडेबारा वाजले होते. बारक्या किल्ल्यावरून उजव्या हाताने आम्ही पुढे निघालो ते चौघे मजा मस्ती करत पुढे चालले होते
गडाची तटबंदी
गडाचे प्रवेशद्वार
खरंतर आता सगळं काही ढासळले आहे त्यामुळे म्हणण्यासारखं काही शिल्लक राहिलं नव्हतं समोर एक देवीची मूर्ती नजरेस पडली. तिथे पाया पडून आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू केली वाटेत पाण्याची 3 तुडुंब भरलेली टाकी दिसलं त्यातलंच पाणी भरलं आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो
गडावरील पाण्याचे टाके
5 मिनिटातच आम्ही बालेकिल्यावर पोहोचलो
गडाचा इतिहास पाहता
हा किल्ला फारच दुर्लक्षित असल्याने सहसा पर्यटक इथे जाण्यासाठी पाठ करतात.हा किल्ला पंधरा मैल दक्षिणेस टकमक आणि दुगाड गावा जवळ आहे.पण किल्याला इतिहास आहे.ऐतिहासिक संदर्भातील नोंदणी प्रमाणे २४ मार्च १७३७ गुरुवारी मराठ्यांची टोळी माहुली किल्ल्याच्या रानातून बाहेर निघाली व पहाटेच्या घोटवाडाच्या अर्थातच गुमतारा दुगाडच्या रानात आली तो सबंध दिवस त्यांनी रानातच घालवला.दिवस उन्हाचे होते व प्रदेश अतिशय गर्मीचा होता त्यामुळे त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार होती.त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन दोन चार लोक हि मेली. .सध्या गडावर राबता न राहिल्याने वाटा सापडणे कठीणच किल्ल्यावर दुर्ग यात्रींचा फारसा सहवास नसल्याने हा किल्ला दुर्लक्षित आहे
बालेकिल्ला
आजूबाजूचा परिसर न्याहाळला गडावरून समोरच दिसणाऱ्या कामनदुर्ग चे विलोभनीय दृश्य नजरेस पडले. आणि क्षणार्धात ताज्या झाल्या मागच्याच महिन्यात केलेल्या कामनदुर्गाच्या सगळ्या आठवणी. ते दृश्य कॅमेरात घेऊन आता आम्ही पोटपूजेला सुरुवात केली.
कामणदुर्ग
एव्हाना २ वाजले होते गडावर अर्धातास फेरफटका मारून अडीच वाजता आम्ही उतरण्याचा निर्णय घेतला. परतीचा प्रवास सुरूच केला होता तेवढ्यात आमच्यातल्या एकाला केळीच्या पानावर INDIAN MOON MOTH दिसला. तो दिसलाच इतका सुंदर होता की आम्ही त्याचं वर्णन करणं कठीण आहे मग काय सुरू झाली फोटोग्राफी. तो सुद्धा पूर्ण वेळ घेऊन पोझ देऊन बसला होता मन भरेपर्यंत फोटो काढले आणि खऱ्या अर्थाने परतीच्या प्रवासाला लागलो.
INDIAN MOON MOTH
एव्हाना मी अमोल चा फॅन झालो होतो. त्यामुळे मी त्याच्यासोबतच गप्पा मारत चाललो होतो. पुन्हा एकदा बारक्या किल्ल्यावर आल्यावर त्याने एक झाडाची फांदी घेतली आणि पूर्ण फांदी खाल्ली तुम्हाला विश्वास बसेल की नाही देव जाणे पण मी त्याचा साक्षीदार आहे. खाल्ल्यावर त्याने त्याच नाव पण सांगितलं त्याला म्हणतात 'डोंगरमेथा'. खात तो होता पण तोंड आमचं बंद झालेलं.
डोंगरमेथा खाताना आपला मित्र
माझ्या सोबत असलेल्या डॉक्टर मित्राला मी विचारलं सुद्धा की अजय समज तू इकडे CLINIC सुरू केलंस तर ते चालेल का रे???? एक मोठा Pause घेऊन आम्ही पुन्हा वाटेला लागलो. आता चाल थंड झाली होती मी त्या मुलांची मस्ती पहात होतो. तेवढ्यात डाव्या बाजूला एक केळ्याचे झाड लागले आणि ते चारी जण त्यावर तुटून पडले मी म्हंटल काय करतात ते बघू. तर ते त्या केळ्याच्या खोडाच्या आतला सफेद भाग खातात. मला असं वाटलं ह्यांच्यासाठी हाच मसालाडोसा.आपण जसे चॉकलेट पाहिल्यावर खुश होतो तसे ते चौघे हे खोड मिळाल्यावर खुश होते. मी मनात म्हंटलं आनंद शोधला तर किती छोट्या छोट्या गोष्टीत असतो. त्यादिवशी त्यामुलांनी मला नकळत खूप काही शिकवलं. एव्हाना आम्हाला गाव दिसायला लागलं होतो आणि घड्याळात पण चार वाजले होते आम्ही आरामात खाली उतरत होतो थोडी चाल मंदावली होती. पोरं पुढे मस्ती करत चालली होती एक ठिकाणी सगळी थांबली आणि आम्ही दिसल्यावरच पुढे निघाली. ती जरी Professional Guide नसली तरी त्यांना त्यांचं काम चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यातल्या एका मुलाने एका झाडाकडे हात दाखवत म्हणाला ह्यो बघ ह्यो "कंचना". मी म्हणालो हे पण खातात का??? तो मला म्हणाला " मंग मस्त आंबाट लागतं" आता मात्र मी गपगार झालेलो. त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि थेट गावात जाऊन थांबलो. FRIENDSHIP DAY च्या दिवशी मिळालेले हे मित्र आयुष्यभर माझ्या आठवणीत राहतील.
THANK YOU... मित्रांनो
गावात गेल्यावर प्रथम अमोलच्या घरी जाऊन त्याच्या आईला सांगितलं मावशी तुमचा मुलगा खूप भारी आहे. माझं हे वाक्य ऐकून त्यांचा चेहरा आनंदाने खुलला. त्यांचं ते हास्य आजही माझ्या आठवणीत आहे.
शेवटी इच्छा नसतानाही अमोल ला Bye Bye करून लवकरच परत येण्याचा विश्वास देऊन घरच्या वाटेला निघालो.
त्यादिवसाने मला खूप काही शिकवलं माणसाच्या परिस्थितीवर काहीच अवलंबून नसतं. माणूस समाधानी असला की तो सुखी असतोच. त्यादिवसाने मला खूप भावुक केलं.
माझा हा ब्लॉग अमोलच्याच आवतीभोवतीच फिरणारा वाटेल पण त्याचं श्रेय हे त्याला दिलंच पाहिजे असं मला वाटलं आणि अमोलला प्रकाशझोतात आणायचा हा छोटासा प्रयत्न. कोणी कधीही ह्या गडावर गेलं तर गावात सांगा आम्हाला अमोल ला घेऊन जायचंय काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल हे नक्की.पुन्हा भेटूत....
जिंकलंस मित्रा !!!
No comments:
Post a Comment