गुजरात दौऱ्याच्या मागील तिन्ही भागात आपण अनुक्रमे पाहिलं अदालज नि वाव, मोढेरा चे सूर्यमंदिर आणि पाटण ची सुप्रसिद्ध रानी कि वाव. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पहिल्या दिवशी सगळं झाल्यामुळे आता बाकी राहिलेलं ते म्हणजे फक्त "दादा हरी नि वाव" त्यामुळे माझ्याकडे बराच वेळ शिल्लक होता. शनिवारी दिवसभर धावपळीत गेल्याने रात्री निवांत झोपून सकाळी आरामात उठायचा विचार केला पण रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी ६.३० लाच जाग आली मग उठलो आवराआवर केली आणि ऊन वाढायच्या आत निघायचं ठरवलं. ७.३० ला हॉटेलमधून बाहेर पडून बस स्टॅन्डकडे वाटचाल चालू केली. हॉटेल पासून बस स्टॅन्ड जवळच असल्याने तिथेही वेळ लागला नाही बस स्टॅन्डवर पोहोचताच समोर अहमदाबादला जाणारी बस दिसली आणि "दादा हरि नी वाव"च्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली.
मी फिरलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या विहिरीमध्ये हि एकाच अशी विहीर आहे ज्या विहिरीमध्ये तळमजल्यापर्यंत प्रवेश करू शकतो. सुमारे २ तास विहिरीमध्ये घालवल्यानंतर तिथून बाहेर पडलो व मागेच असलेल्या मशिदीस भेट दिली दुपार झाल्यामुळे तिथे प्रवेश बंद होता पण बाजूला असलेल्या दर्ग्यास भेट दिली. तो दर्गा म्हणजे धर्मगुरू दाई हलीम हयांचा दर्गा. तिथल्या लोकांच्या माहितीनुसार दादा हरि असं काही नाहीच आहे दाई हलीमा वरून विहिरीचे नाव हे दादा हरि असं पडलं.
अशा तऱ्हेने एकट्याने केलेला गुजरात दौरा यशस्वी झाला.
शेवटी एकच म्हणेन अमिताभ बच्चन बरोबर म्हणत होते कुछ दिन तो गुजारो गुजरात में...
असो अखेर ...બાય બાય ગુજરત
दादा हरी नी वाव
पाटण अहमदाबाद बस
८ वाजता पाटणवरून अहमदाबादसाठी बस पकडली. जाताना सगळी ठिकाणं करत करत गेल्याने अहमदाबाद ते पाटण किती अंतर आहे ह्याचा अंदाज आला नाही परंतु थेट बस पकडल्यावर लक्षात आलं २ तास झाले तरी अहमदाबाद येण्याचा काही नाव घेत नव्हतं शेवटी कंटाळून गुगल मॅप सुरु करून आजूबाजूला जवळपास काय आहे ह्याचा अंदाज घेतला. वाटेवर साबरमती आश्रम लागत होता म्हणून शेवटी अहमदाबाद पर्यंत न जाता साबरमती आश्रमजवळ उतरण्याचा निर्णय घेतला.
साबरमती आश्रम
दांडी यात्रा
सुमारे १०.३० च्या सुमारास साबरमती आश्रमात प्रवेश केला. तेथील गांधीजींच्या व्यक्तिचरित्रावर एक कटाक्ष टाकला. बाजूने जाणाऱ्या साबरमती नदीचं पात्र पाहिलं सोबतच खादी विक्री केंद्र, वाचनालय, विनोबा भावेंची राहण्याची जागा ह्या सगळ्याना भेट देऊन सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साबरमती आश्रमातून बाहेर पडलो.
मिठाचा सत्याग्रह
साबरमती नदीचे पात्र
परत एकदा गूगल मॅप उघडून पाहिलं तेव्हा तिथे प्रसिद्ध अशी एक मस्जिद पहिली ज्याचं नाव सिद्दी सय्यद मस्जिद. ह्या मस्जिदीवरील भिंतीत एका जाळीवर काढलेलं एका झाडाचं शिल्प प्रसिद्ध आहे. ते पाहिल्यावर आपल्याला सुद्धा त्या कारीगिरीचं नवल वाटतं. अंदाजे १५-२० मिनिट मस्जिद मध्ये घालवून आता खऱ्या ध्येयाच्या दिशेने प्रवास केला ते म्हणजे "दादा हरी नि वाव".
सिद्दी सय्यद मस्जिद
समोर जाळीमध्ये दिसत असलेलं प्रसिद्ध शिल्प
बरोबर एक वाजता मी दादा हरी नी वाव जवळ पोहोचलो. सगळ्या वाव सारखीच हि सुद्धा लांबलचक व प्रशस्त जागा असणारी विहीर. १४ व्या शतकात मोहम्मद बेगडाच्या अधिपत्याखाली ह्या विहिरीचं बांधकाम झालं अडालजच्या विहिरीपेक्षा सुद्धा हि वाव मोठी आहे.
एकंदरीत असलेला विहिरीचा आवाका
विहिरीचे प्रवेशद्वार
सुमारे ५०० वर्ष जुन्या बांधलेल्या दादा हरी नि वावचे बांधकाम हे सोलंकी वास्तुशास्त्रीय शैलीतील लाल दगडात बांधलेले आहे . विहिरीच्या प्रत्येक मजल्यावर अष्टकोनी (8-बाजूचे बहुभुज) आहे, हे संपूर्ण बांधकाम जबरदस्त कोरलेल्या मोठ्या खांबांवर उभे आहे. प्रत्येक मजल्यावर लोकांसाठी एकत्रित करण्यासाठी पुरेशी जागा आहे.
अष्टकोनी बांधकाम
विहिरीचा आतील भाग
वर्षभर होणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी चढउतारांची नोंद घेण्यासाठी त्या पातळीवर भूगर्भात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट जागा आहे. शेवटच्या मजल्यापर्यंत खेळती हवा राहण्यासाठी म्हणून उघडे छत बांधण्यात आले आहे. विहिरीच्या दोन्ही बाजूस खालून वर अथवा वरून खाली जाण्यासाठी गोलाकार जिन्यांची बांधणी केली आहे प्रत्येक मजल्यावर प्रकारचे शिल्प नजरेस पडतात.
हवा खेळती राहण्यासाठी असलेले छत
ये-जा करण्यासाठी असलेले गोलाकार जिने
विहिरीतील आतील बाजूस असलेली कलाकुसर
दाई हलीम मस्जिद
दाई हलीम दर्गा
दर्ग्याचे प्रवेशद्वार
तिकडच्या लोकांकडून जागेच महत्व ऐकून सुमारे ४.३० च्या सुमारास अहमदाबाद रेल्वे स्टेशनकडे निघण्यास सुरवात केली. परतीची ट्रेन ८.३० ची होती हाताशी बराच वेळसुद्धा होता पण उन्हामुळे कुठेच जाण्याची इच्छा नव्हती म्हणून गप्प रेल्वे स्टेशन वर बसून ४ तास काढले व ८.३० ची ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने रवाना झालो.अशा तऱ्हेने एकट्याने केलेला गुजरात दौरा यशस्वी झाला.
शेवटी एकच म्हणेन अमिताभ बच्चन बरोबर म्हणत होते कुछ दिन तो गुजारो गुजरात में...
असो अखेर ...બાય બાય ગુજરત
GOOGLE LOCATION OF DADA HARI NI VAV
Good one.
ReplyDeleteTHANK YOU AJAY PRADHAN
Deleteonce Again अप्रतिम लिखाण आणि फोटो
ReplyDeleteTHANK YOU GIRISH KULKARNI SIR
Delete