ह्या वेळच्या कोंकण दौऱ्यात मी आणि माझी ट्रेकिंग पार्टनर अश्विनीने कोकणातले ट्रेक किंवा जंगल फिरण्याच ठरवलं होतं त्याप्रमाणे भेकुर्ली नावाच्या गावात गेल्यावर समोर एक गड दिसला तिकडच्या लोकांना विचारल्यावर कळलं की त्या गडाचं नाव "पारगड"


मोरले गावातून दिसणारा पारगड
मग तिकडे जायची तळमळ चालू झाली इकडून तिकडून माहिती काढून पायथ्याचे गाव वगैरे चौकशी करूननिघायची योजना आखली पण कोणी माहितगार नसल्यामुळे आधी थोडी भीती होती कारण मुंबईतली जंगले आणि कोकणातली ह्यात बराच फरक आहे पण तरीही हिंमत एकवटून दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचा धाडसी निर्णय घेतला.
सकाळी ७.५० च्या सुमारास घरातून निघालो वाटेत मोराचं सुंदर दर्शन झालं तिकडेच कळलं दिवस भारीच असणार. तसाच प्रवास चालू ठेऊन दोडामार्ग बेडशी मार्गे मोरले ह्या गावात पोचलो गावकऱ्यांशी थोडी चर्चा करून वाटेचा अंदाज घेतला आणि सुमारे ९.१५ च्या सुमारास चालायला सुरुवात केली
मोरले गावातील देऊळ
राष्ट्रीय पक्षी मोर
गावातल्या मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारी वाट थेट पारगडावर जाते सुरुवातीला सोपी वाटणारी ही वाट लगेचच ६०-७० अंशाच्या कोनात चढाई ला सुरवात करायला लावते. पाऊस असेल तर चढताना काही वाटणार नाही पण पाऊस नसल्याकारणाने आम्ही जवळपास घामाने भिजलो होतो आत्ता येईल आत्ता येईल म्हणता म्हणता २ तास झाले तरी ना गड दिसत होता ना कोणी माणूस. पूर्ण जंगलात फक्त पक्षांचे आवाज आणि आजूबाजूला फिरणारी फुलपाखरे ह्या सगळ्यांचे फोटो काढत काढत आमची चढाई सुरू होती
मध्येच एक छोटीशी नदी लागली मग तिकडेच थोडा वेळ विसावा घ्यायचं ठरवलं थोडेसे फ्रेश झालो आणि परत पुढच्या वाटचाली ला सुरुवात केली. एव्हाना आम्ही आमच्या अंदाजानुसार बऱ्यापैकी वर पोचलो होतो तेव्हा आम्हाला त्या जंगलात एक माणूस दिसला तो लाकडं तोडायला आला होता. आम्हाला बरं वाटलं मग त्यांना आम्ही विचारलं की काका अजून पारगड किती लांब आहे तर त्यांचं उत्तर ऐकून आम्ही हैराण होतो ते म्हणाले "हे काय आलाच की पारगड इथून पुढे थोडी पाऊलवाट आहे, ती चाललात की पुढे एक डांबरी रस्ता लागेल, ती पार केली की मग पायऱ्या लागतील, त्या पायऱ्यांनी तुम्ही गडावर पोहोचाल म्हणजे खरा ट्रेक हा तेव्हाच असतो जेव्हा आपल्याला वाटत असतं आपण पोचलो पण तेव्हा आपल्याला कळतं की अर्ध चढायचं बाकी आहे.
तेव्हाच माझ्या मनात विचार आला की,पारगड पर्यंत पोचण्यासाठी मातीचा रस्ता, जंगलवाट, नदी, डांबरी रस्ता इतकं सगळं "पार" करून जावं लागतं कदाचित म्हणून च त्याला "पारगड" म्हणत असावे
त्या काकांशी गप्पा मारत मारत आम्ही डांबरी रस्त्यापर्यंत पोचलो मग सुमारे अर्धा तास त्या डांबरी रस्त्यावरून चालून आम्ही परगडाच्या पायऱ्यापक्षी पोचलो पारगड हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात येतो म्हणजे तसं पाहायला गेलं तर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला होता हे आम्हाला तिकडे गेल्यावरच कळलं. वाटेवर असणारे ऐतिहासिक फलक वाचत आम्ही गडावर पोचलो वाटेत एक हनुमानाचे मंदिर आहे व त्याच बाजूला त्याकाळच्या काही तोफांचे अवशेष आहेत .
हनुमान मंदिर व १६ व्या शतकातील तोफांचे अवशेष
भरपूर भूक लागल्याने आधी जेवणाची ऑर्डर द्यायचं ठरवलं जेवणाची ऑर्डर दिली आणि पुढे चालत असता डाव्या बाजूला शिवाजी महाराजांची एक अप्रतिम उभी च्या उभी मूर्ती आहे आजपर्यंत महाराजांचे अश्वारूढ पुतळे बरेच पाहिलेले पण ह्या पुतळ्याला तोड नाही तिथेच महाराजांना मुजरा करून पुढे वाटचाल चालू ठेवली.
शिवाजी महाराजांचा अप्रतिम पुतळा
तिथून १०० पाऊले पुढे जाताच पुढे भवानी मातेचं एक भव्य असं मंदिर आहे आणि माझ्या मते ह्या मंदिराची हीच योग्य जागा आहे कारण आजपर्यंत मी देवळात फक्त देवाच्या मुर्त्या पहिल्या आहेत पण हे मी असं पाहिलं देऊळ पाहिलंय जिथे जिजाऊंपासून ते त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांपर्यंत सगळ्यांच्या मुर्त्या आहेत म्हणजे ते पाहून आपण खरच १६ व्या शतकात प्रवेश केल्यासारखं वाटतं. देवळात दर्शन घेत असताच बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली थोडा वेळ मंदिरात पाऊस कमी व्हायची वाट बघून नंतर आम्ही बाहेर पडलो हवेत मस्त गारवा आला होता
भवानी मातेच आकर्षक मंदिर
तेव्हाच आम्हाला उंचीचा अंदाज आला आता वेळ होती आजूबाजूचा गड फिरायची. चारही बाजूनी गड फिरलो निसर्गाची शांतता अनुभवली गडाबद्दल चे ऐतिहासिक फलक वाचल्यावर कळलं की पारगड, गंधर्वगड, कलनिधींगड, महिपालगड,वल्लभगड, सामानगड असे बरेच गड स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारले होते
पारगड तसा छोटा असल्याकारणाने आजूबाजूचा निसर्ग अनुभवून आम्ही जेवायच्या ठिकाणी आलो तोपर्यंत सुमारे अडीच वाजले होते आम्ही पोटभर जेऊन सुमारे साडेतीन च्या सुमारास खाली उतरायला सुरुवात केली आणि जी वाट चढायला आम्हाला सकाळी ३ तास लागलेले तीच वाट उतरायला आम्हाला फक्त १ तास लागला. आम्ही बरोबर ४.४५ ला पुन्हा गडाच्या पायथ्याजवळील देवळाकडे होतो खरंतर आम्ही इतक्या लवकर खाली आलो ह्या गोष्टीवर आमचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. खाली येऊन आम्ही एकमेकांना दाखवत होतो की एक तासापूर्वी आपण तिकडे होतो
परगडावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य
पुन्हा कधी ह्या परिसरात फिरायची वेळ आली तर नवीन गडांची माहिती मिळालीच आहे तेव्हा त्यांना नक्की भेट देऊ तो पर्यंत Good bye.....
लवकरच भेटूत........
परतीचा प्रवास
No comments:
Post a Comment