गणपती गडद ट्रेकच्या उन्हाची झळ पाहता ट्रेकचे पर्व संपल्याची जवळपास जाणीव झालीच होती म्हणून मग तेव्हाच ठरवलं आता कासला जाण्याची योग्य वेळ आली आहे म्हणून मग कासच्या पठारावर जाण्याचा विचार केला. विचार कसला बुकिंगच केलं. पाहिले कास पठारचं बुकिंग आणि मग बसचं बुकिंग.
बस पण ह्यावेळी साधी सुधी नाही तर थेट शिवशाही स्लीपर. ह्यामध्ये मी एक गोष्ट आवर्जून सांगेन शिवशाही स्लीपर आयुष्यात एकदा नक्की अनुभवून पहा. शनिवारी रात्री ठाण्यावरून १० ची शिवशाही पकडून सकाळी साडेचारच्या सुमारास सातारा बस डेपोला पोचलो. तिथे चहा नाश्ता केला आणि साडेपाच वाजताची कास पठारला जाणारी बस पकडली साताऱ्यापासून कास २५ किमी अंतरावर आहे. मोजक्याच बस असल्यामुळे आम्ही साडेपाचची बस पकडून साडेसहाला कासला पोचलो. आता पुढचा सगळा प्रवास फोटो मधूनच मांडतो...
शिवशाही स्लीपर
सकाळचा चहा नाश्ता
कास पठारावरील रम्य सकाळ
चिंचुर्डी
गेंद (धनगर गवत)
LAWI CHIRAYAT
पहाटेचे दवबिंदु
दीपकाडी
सोनकी
तारागुच्छ
आभाळी
नभाळी
कास पठारावरील स्वर्गसुख
स्मिथिया अगरकारी
तुतारी
चवर
जरतारी
निळी पापणी
LAWI CHIRAYAT
पंद - पिंडा कोंकणांसीय
रानमंजिरी
कुमुदिनी (पान भोपळी)
कुमुदिनी तलाव
अबोलिमा
कास पठारावरील निरभ्र आकाश
Halunda
तेरड्याचे विविध रंग
कास पठारावर निदर्शनास आलेली काही फुले

सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतचेच बुकिंग होतं पण तरीही तीन तासात पठार बघून होतं का?? म्हणून आम्ही नाही नाही म्हणत १२ वाजेपर्यंत वेळ काढला. पण वेळेचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडायचा निर्णय घेतला कारण एव्हाना गर्दीही वाढली होती. तेव्हढ्यात एक ग्रुप फोटो घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो.
फुल्ल ऑन धमाल
वाढलेली गर्दी
कासचं पठार एकदा पाहून पोट भरण्यासारखं नाहीये त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा नक्की भेट होईलच. पण कासला जाणाऱ्या सगळ्यांसाठी गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे एक तर आपली कार घेऊन जावी नाहीतर बसचा व्यवस्थित अंदाज घेऊन जावं.
बाकी कास म्हणजे एकदम झकासच आहे....
सौजन्य
फुलांची माहिती - अजय प्रधान



































































