लागोपाठ बारावा रविवार जेव्हा मी घरी नव्हतो. पण ह्यावेळी कुठे जायचे ते नक्की नव्हते त्यामुळे मी माझ्या नेहमीच्या ट्रेक ग्रुप ला ह्यावेळी सांगून ठेवलेलं की पुढचा रविवार मी नसेन म्हणून त्यांनी पण मी आधी जाऊन आलेल्या ठिकणी जायचं ठरवलं. ते म्हणजे गणपती गडद. पण गणपती गडद म्हटल्यावर मला ही राहावेनासे झाले. ह्यावेळी उर्मिला येणार असल्याने तीने मला सांगितलेलं की तू बोलशील तिथे जाऊ. मग तिला म्हंटलं चल गणपती गडदलाच जाऊ. ठरलं तर मग रविवारी सकाळी ६ वाजता उठून ७ वाजता आम्ही BIKE वरून प्रवासाला सुरुवात केली.
गणपती गडद म्हणजे डोंगरात कोरलेली लेणी. गणपती गडदला जायचं झाल्यास प्रवास मोठा आहे पण हा ट्रेक वसूल आहे. गणपती गडदचा प्रवास म्हणजे कल्याण-मुरबाड-धसई आणि मग गणपती गडदच गाव म्हणजे सोनावळे. वाटेत मुरबाड आणि धसईच्यामध्ये गोरखगडचे अप्रतिम दृश्य नजरेस पडते. गोरखगड म्हणजे माझा जीव कि प्राण. सोनावळे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला लेणी दिसते तेच गणपती गडद.
पुढेच एक ओढा वाहत होता तो पार करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो गप्पा मारत मारत आम्ही पुढे जात होतो जसंजसे पुढे जात होतं तसंतसं आम्हाला आमचं ध्येय जवळ दिसत होतं पण वाट लांबची होती कारण आत्ताशी पाऊलवाट होती. अजून चढाईला वेळ होता. पण एवढ्या गरमीमध्येसुद्धा एकच गोष्ट चांगली होती की ह्या जंगलात बघायला खूप काही मिळाले. छोटे छोटे कीटक नवीन नवीन फुलं पक्षी हे सगळं कॅमेरात टिपत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला होता.
आता मात्र चढाईला सुरुवात झाली होती. सुमारे अर्धा तासाचीच असणारी चढाई उन्हामुळे जास्तच वाटत होती म्हणून आरामात वर चढत आता आम्ही थेट गणपती गडद च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाजूलाच थेंब थेंब का ना होईना धबधबा पडत होता त्यात सगळ्यांनी भिजून घेतलं आणि थेट गडदीत प्रवेश केला गडदीतुन समोरचा निसर्ग स्पष्ट दिसत होता समोर तीन तलाव उजव्या बाजूला नाणेघाट.
गणपती गडद म्हणजे डोंगरात कोरलेली लेणी. गणपती गडदला जायचं झाल्यास प्रवास मोठा आहे पण हा ट्रेक वसूल आहे. गणपती गडदचा प्रवास म्हणजे कल्याण-मुरबाड-धसई आणि मग गणपती गडदच गाव म्हणजे सोनावळे. वाटेत मुरबाड आणि धसईच्यामध्ये गोरखगडचे अप्रतिम दृश्य नजरेस पडते. गोरखगड म्हणजे माझा जीव कि प्राण. सोनावळे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला लेणी दिसते तेच गणपती गडद.
गोरखगड
सुमारे दहा वाजताच्या सुमारास आम्ही सोनावले गावात पोहोचलो गाडी गावात लावली आणि सरळ वर चढायला सुरुवात केली. प्रचंड ऊन असल्याने हालत होणार हे नक्कीच होतं खरं तर गणपती गडद करायचं झाल्यास पाऊस असल्यावरच करावा. तेंव्हाचं निसर्गसौंदर्य काही औरच असतं. पण असो आम्ही सुमारे १० च्या सुमारास चालायला सुरुवात केली गावात गावकऱ्यांची शेती दिसली .पुढेच एक ओढा वाहत होता तो पार करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो गप्पा मारत मारत आम्ही पुढे जात होतो जसंजसे पुढे जात होतं तसंतसं आम्हाला आमचं ध्येय जवळ दिसत होतं पण वाट लांबची होती कारण आत्ताशी पाऊलवाट होती. अजून चढाईला वेळ होता. पण एवढ्या गरमीमध्येसुद्धा एकच गोष्ट चांगली होती की ह्या जंगलात बघायला खूप काही मिळाले. छोटे छोटे कीटक नवीन नवीन फुलं पक्षी हे सगळं कॅमेरात टिपत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला होता.
आता मात्र चढाईला सुरुवात झाली होती. सुमारे अर्धा तासाचीच असणारी चढाई उन्हामुळे जास्तच वाटत होती म्हणून आरामात वर चढत आता आम्ही थेट गणपती गडद च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाजूलाच थेंब थेंब का ना होईना धबधबा पडत होता त्यात सगळ्यांनी भिजून घेतलं आणि थेट गडदीत प्रवेश केला गडदीतुन समोरचा निसर्ग स्पष्ट दिसत होता समोर तीन तलाव उजव्या बाजूला नाणेघाट.
नाणेघाट
समोरचा निसर्ग शांतपणे अनुभवून आम्ही गडदीतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे गडदीमध्ये बऱ्यापैकी शांतता होती. इतक्या वेळ उन्हात चालत असल्याने आता भूकसुद्धा प्रचंड लागली होती त्यामुळे पटापट बॅगेतुन डबे काढून आम्ही पेटपुजेला सुरवात केली. पोटभर जेवून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.
गडदीतला गणपती
परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तोच आकाशात काळे ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली. आधी वाटलं दोन पाच मिनिटंच हा राहील पण तो जो सुरू झाला तो थेट खाली आल्यावरच थांबला. पण ह्या पावसामुळे मागे वळून बघितल्यावर गणपती गडदचे खरे सौंदर्य नजरेस पडले.
परतीचा प्रवास
गणपती गडदचे खरे सौंदर्य
त्याकडे ५ मिनिटं एक टक लावून बघून पुन्हा आपली वाट धरली आणि थेट गावात जाऊन थांबलो. गावात पिवळ्या रंगाची बरीच फुले नजरेस पडली तेव्हा कासची आठवण झाली तेव्हा मनात आलं आता कासला जायला हवं. ठरलं तर मग पुढचं ठिकाण कासच पठार.
कास पठाराची आठवण
एव्हाना ५ वाजले होते गावात उतरून पटापट १ कप चहा घेतला व मी आणि उर्मिला बाकी सगळ्यांचा निरोप घेऊन घरच्या वाटेला लागलो. वाटेतच बदलापूरच्या प्रसिध्द वडापावचा आस्वाद घेतला आणि साडेसातच्या सुमारास घरी पोचलो.
मुळगावचा प्रसिद्ध वडापाव
गणपती गडदच्या ट्रेक चे काही निवडक फोटो
No comments:
Post a Comment