गेले २ रविवार कुठेही गेलो नसल्याकारणाने घरी बसून असाही कंटाळा आलेला त्यामुळे येणाऱ्या सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं हा विचार चालू होता आणि जवळचं भेट देण्यासारखं आणि रोमांचकारी ठिकाण म्हणजे "गोरखगड"
मी प्रशांत दादा आणि त्याचा मुलगा अनिरुद्ध असे आम्ही एका बाईक वरून गोरखगड ला जायचं ठरवलं
अखेर तो दिवस आला

२६ जानेवारी ची सकाळ घरून सुमारे सकाळी ६ वाजता गोरखगडाच्या दिशेने वाटचाल चालू केली गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे गोरखगड हा कल्याण पासून सुमारे ५५-६० किमी आहे त्यामुळे तिथे पोहचण्यास सुमारे दीड तास लागतो प्रथम आम्ही वाटेत लागणाऱ्या बालाजी मंदिरात जाऊन बालाजी चे दर्शन घेतले व पुढचा प्रवास चालू केला हवेत गारवा असल्याकारणारे गाडी चा वेग तास बेताचा च होता सूर्योदय सुद्धा व्हायचा बाकी असल्यामुळे आम्ही थोड्याच वेळात सूर्योदयाचा आनंद घेतला आणि आपली वाटचाल चालू ठेवली सुमारे एक तासात आम्ही म्हसाजवळ येऊन पोचलो आपली स्वतःची गाडी असेल तर म्हसाच्या चौकात हॉटेल गुरुप्रसाद आहे तिथल्या चहाचा आस्वाद नक्की घ्यावा आम्ही चहा नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरवात केली २६ जानेवारी असल्याकारणाने आम्हाला वाटेत शाळेची प्रभातफेरी दिसली "भारत माता कि जय" "वंदे मातरम" अश्या घोषणा चालू होत्या तेच पाहत आम्ही ८.३० च्या सुमारास गोरखगडाच्या पायथ्याशी जाऊन पोचलो
तिथून आम्ही आमच्या खऱ्या प्रवासाला सुरवात केली देहरी गावापासून सुमारे दीड तासात आपण गोरक्षनाथांच्या मंदिरापर्यंत जाऊन पोचतो गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. डाव्या बाजूला आम्हाला गोरखगड चा सुळका खुणावत होता जस जस चालत होतो तसं तसं आम्हाला वरून सुरेख नजारा दिसत होता उजव्या बाजूला साकल माची सिद्धगड आणि डाव्या बाजूला गोरखगड आणि मच्छीन्द्रगड म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आपण सह्याद्रीत फिरत असल्याचा अनुभव हा प्रसंग देत होता

वाटेवरून खुणावणारा गोरखगड़
गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे. एक दीड तासाच्या वाटचाली नंतर आम्ही गोरक्षनाथांच्या समाधी जवळ येऊन पोचलो गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन पुढच्या वाटचालीचा निर्णय घेतला मंदिराच्या डाव्या बाजूने वर जाणारी वाट हि आपल्याला गोरखगडाच्या दरवाजा कडे घेऊन जाते पुढची वाटचाल हि प्रयत्नांची परीक्षा बघणारी वाट होती आम्ही चालण्यास सुरवात केली पहिला रॉक पॅच आला होता थोडस पाणी पिऊन आम्ही पुढे निघायचा निर्णय घेतला समोर दिसलेल्या दरवाज्या कडे पाहिलं की आपल्याला वाटतं आपण पोचलो पण नंतर कळत कि ही तर खरी सुरवात आहे तो एका कातळात कोरलेला दगड पहिला कि तेव्हाच्या कारागिरांचे कसब दिसून येते दरवाज्यातून वर चढून गेल्यावर दोन तीन पाण्याची टाके लागतात. समोरची वाट पुन्हा थोड्याच्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पायऱ्यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. समोरच असणार ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.

गोरक्षनाथ महाराजांचे मंदिर
पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी निवाऱ्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’ पडले.

शिवकालात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. आजही ह्या गडांच्या अतिविशाल कोरलेल्या कातळात तेव्हाचे शिलालेख उपलब्ध आहे
गोरखगडावर जाताना लागणाऱ्या पायऱ्यामध्ये कोरलेला शिलालेख
गोरखगडाच्या गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५०-६० पायऱ्या खोदलेल्या आहेत. पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते कारण दिवसेंदिवस ह्या पायऱ्या निमुळत्या होत चालल्या आहेत उजव्या बाजूला अतिविशाल कातळ आणि डाव्या बाजूला खोल दरी अश्या परिस्थितीतून आपल्याला वर जायचे असते पण हा आनंद सुद्धा काही औरच.... गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघात असा सर्व परिसर न्याहाळता येतो.

गोरखगडावरून दिसणारा मच्छीन्द्रगड

गोरखगडावर असलेल्या ह्या गुहेत २०-२५ जणांना आरामात राहता येते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास दहेरी मार्गे लागतात
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
पुन्हा भेटून नविन गडासोबत नविन अनुभवांसोबत . . . . . . . .
गड़ांवरील माहितीसाठीचा हा माझा पहिला वहीला प्रयत्न
तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे
Apratim.. asach lihit raha.. aamhala navanavin anubhav det raha.. 😄😍
ReplyDeletev nice Ajinkya..kadhi kalavnaar ki navin blog suru kela aahes. keep up
ReplyDeleteSuper and amazing
ReplyDeleteGood Carry on and knows us to next trip.
ReplyDelete